Acts 1:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर दोघातील एकाची निवड करण्यासाठी प्रेषितांनी फासे (सोंगठ्या) टाकले. फाशावरुन प्रभुला मत्थिया पाहिजे होता हे दिसून आले. म्हणून तो इतर अकरा शिष्यांसह प्रेषित झाला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणजे येशू आपणामध्ये येत जात असे, त्या सगळ्या कालावधीत जी माणसे आपल्याबरोबर होती त्यांच्यांतून एकाने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा साक्षीदार म्हणून आमच्याबरोबर सहभागी व्हावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणजे तो आपल्यामध्ये येत-जात असे त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रारंभीपासून म्हणजे योहानाकडून येशूंचा बाप्तिस्मा झाला, त्या दिवसापासून येशूंना स्वर्गात घेतले जाईपर्यंत, कारण यांच्यामधून एकाने आपल्याबरोबर येशूंच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार असणे आवश्यक आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले, त्या दिवसापर्यंत तर जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.