Acts 10:2 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कर्नेल्य हा धर्मशील असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो धार्मिक होता व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, पुष्कळ दानधर्म करणारा व देवाचा नित्य धावा करणारा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो व त्याचे सारे कुटुंब धार्मिक व परमेश्वराला भिऊन वागणारे होते; तो उदारहस्ते गरजवंतांना दानधर्म करीत असे आणि परमेश्वराची नियमितपणे प्रार्थना करीत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कर्नेल्य हा भक्तीमान असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता; तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.