Acts 10:32 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे. पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे. आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर यापो येथे कोणाला पाठवून पेत्र या नावाने राहणाऱ्या शिमोनाला बोलावून आण, तो समुद्रकिनारी शिमोन चर्मकाराच्या घरी पाहुणा आहे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन ह्याला बोलावून आण; तो समुद्राच्या काठी कातडे कमावणार्‍या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.’ [तो आल्यावर तुझ्याशी बोलेल].
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता योप्पा येथे शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे. ज्याचे घर समुद्राकाठी आहे त्या शिमोन चांभाराच्या घरी तो पाहुणा आहे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे, पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.