Acts 10:45 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदी विश्वासाणारे जे पेत्राबरोबर आले होते, ते चकित झाले. यहूदी नसलेल्या लोकांवरसुद्धा पवित्र आत्मा ओतला गला, यामुळे ते चकित झाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
यहुदीतरांवरही पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव झाला आहे, असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या व सुंता झालेल्या श्रद्धावंत लोकांना आश्चर्य वाटले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणार्‍या व सुंता झालेल्या सर्व लोकांना आश्‍चर्य वाटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेत्राबरोबर आलेले विश्वासणारे, ज्यांची सुंता झाली होती ते आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी पाहिले की गैरयहूदी लोकांवरसुद्धा पवित्र आत्मा ओतून दिला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदी सुंता झालेले विश्वास ठेवणारे जे पेत्राबरोबर आले होते, ते चकित झाले, यहूदी नसलेल्या लोकांवरसुद्धा पवित्र आत्माच्या दानाचा वर्षाव झाला आहे, यामुळे ते चकित झाले.