Acts 11:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आत्म्याने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्याबरोबर जाण्यास सांगितले. हे सहा बंधु (विश्वासणारे) जे येथे आहेत, तेही माझ्याबरोबर होते. आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा पवित्र आत्म्याने मला सांगितले, ‘काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.’ ते सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही कर्नेल्यच्या घरी गेलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा आत्म्याने मला सांगितले की, ‘काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.’ मग हे सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा आत्मा मला म्हणाला त्यांच्याबरोबर जाण्यास संकोच करू नको. मजबरोबर सहा बंधूही सोबतीला होते आणि आम्ही त्या मनुष्याच्या घरी प्रवेश केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आत्म्याने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्याबरोबर जाण्यास सांगितले, हे सहा बंधू जे येथे आहेत, तेही माझ्याबरोबर होते, आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो.