Acts 11:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा यहूदी विश्वासणाऱ्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा त्यांनी आपले म्हणणे थांबविले, त्यांनी देवाची स्तति केली आणि म्हणाले. “म्हणजे देव यहूदी नसलेल्यांना त्यांचे अंत;करण बदलण्यासाठी मोकळीक देत आहे आणि आम्हांला जसे जीवन प्राप्त झाले तसे त्यांनाही देऊ इच्छीत आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे ऐकून त्यांनी टीका करणे बंद केले आणि देवाचा गौरव करीत ते म्हणाले, “तर मग देवाने यहुदीतरांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ऐकून ते उगे राहिले आणि देवाचा गौरव करत बोलले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्‍चात्तापबुद्धी दिली आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांच्याकडे आणखी काही प्रश्न राहिले नाहीत आणि ते परमेश्वराची स्तुती करू लागले व म्हणाले, “तर आता परमेश्वराने गैरयहूदीयांनाही पश्चात्ताप करण्याची संधी दिली आहे ज्यामुळे त्यांना जीवन प्राप्त होईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते शांत राहिले, त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”