Acts 11:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पेत्र म्हणाला, “मी यापो शहरात होतो. प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मला दृष्टान्त घडला. मी दृष्टान्तामध्ये आकाशातून काही तरी खाली येताना पाहिले. ते मोठ्या चादरीसारखे दिसत होते. व त्याचे चारही कोपरे धरुन ते खाली सोडले जात होते. ते खाली आले आणि अगदी माझ्याजवळ थांबले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“मी यापो नगरात प्रार्थना करत होतो, तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले व ते मोठ्या चादरीसारखे चार कोपरे धरून आकाशांतून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मी यापो नगरात प्रार्थना करत होतो; तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले, व ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो म्हणाला, “मी योप्पा शहरात प्रार्थना करीत असताना, माझे देहभान सुटले तेव्हा मी दृष्टान्त पाहिला. त्यामध्ये मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून आकाशातून खाली सोडले जात आहे आणि मी जिथे होतो तिथे ते खाली आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेत्र म्हणाला, मी यापो शहरात प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मी एक दृष्टांत पाहिला की, मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेली एक चादर माझ्यापर्यंत आली.