Acts 12:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या गोष्टीची जाणीव झाल्यावर पेत्र मरीयेच्या घरी गेला. ती योहानाची आई होती. (योहानाला मार्क असेही म्हणत) पुष्कळ लोक त्या ठिकाणी जमले होते. ते सर्व प्रार्थना करीत होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे लक्षात आल्यावर तो योहान ऊर्फ मार्कची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरीया हिच्या घरी गेला; तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे त्याला स्पष्टपणे समजल्यानंतर, योहान ज्याला मार्क असेही म्हणतात त्याची आई मरीयाच्या घरी गेला. तिथे अनेक लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या गोष्टींची जाणीव झाल्यावर पेत्र मरीयेच्या घरी गेला, ती योहान ज्याला मार्कही म्हणत त्याची आई होती, पुष्कळ लोक त्याठिकाणी जमले होते, ते सर्व प्रार्थना करीत होते.