Acts 12:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
विश्वासणारे रुदाला म्हणाले, “तू बावचळलीस!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली. म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिज!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी तिला म्हटले, “तू वेडी आहेस”, तरीही तिने खातरीपूर्वक सांगितले, “मी म्हणते तसेच आहे.” ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी तिला म्हटले, “तू बावचळलीस.” तरी तिने खातरीपूर्वक सांगितले की, “मी म्हणते तसेच आहे.” ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत आहे!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते तिला म्हणाले, “तुझे मन ठिकाण्यावर नाही,” परंतु ती आग्रहाने सांगू लागली, तेव्हा ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत असावा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
विश्वास ठेवणारे रुदाला म्हणाले, “तुला वेड लागले आहे!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली, म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिजे.”