Acts 12:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण पेत्र बाहेरुन दार सारखे ठोठावत होता. जेव्हा विश्वासणाऱ्यांनी दार उघडले, तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले. ते चकित झाले होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पेत्र तसाच ठोठावत राहिला असता शेवटी त्यांनी दरवाजा उघडला. त्याला पाहून ते थक्क झाले!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग पेत्र तसाच ठोकत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु पेत्र ठोठावीत राहिला आणि जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला व त्याला पाहिले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण पेत्र बाहेरून फाटक सारखे ठोठावत होता, जेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांनी फाटक उघडले, तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले, ते चकित झाले होते.