Acts 12:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले, मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले. तो म्हणाला. “याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा.” मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने हाताने त्यांना खुणावून गप्प राहायला सुचवून आपणाला प्रभूने कसे बाहेर काढले, हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले, “हे याकोबला व बंधुजनांना सांगा.” नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ‘उगे राहा,’ म्हणून त्याने हाताने त्यांना खुणावले, आणि आपल्याला प्रभूने कसे बाहेर काढले हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले की, “हे याकोबाला व बंधुजनांना सांगा.” नंतर तो दुसर्या ठिकाणी निघून गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेत्राने त्यांना आपल्या हाताने खुणावून शांत केले आणि प्रभूने त्याला तुरुंगातून कसे बाहेर काढले, हे त्यांना सविस्तर सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, “याकोब आणि बंधू भगिनींना याबद्दल सांगा,” मग तो दुसर्या स्थळी निघून गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले, मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले, तो म्हणाला, “याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा,” मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला.