Acts 12:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्याला शोधू शकला नाही. मग हेरोदाने पहारेकऱ्यांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली. नंतर हेरोद यहूदातून निघून गेला. तो कैसरीया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हेरोदने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही म्हणून त्याने पहारेकऱ्यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. त्यानंतर हेरोद यहुदियातून निघून कैसरियात जाऊन राहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेरोदाने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही; म्हणून त्याने पहारेकर्यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. मग तो यहूदीयाहून कैसरीयात येऊन राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेरोदाने त्याचा पूर्ण शोध करूनही तो सापडला नाही, तेव्हा त्याने त्या सोळा पहारेकर्यांची उलट तपासणी करून त्यांना मरणदंडाच्या शिक्षेचा आदेश दिला. यानंतर हेरोद यहूदीयातून कैसरीयात गेला व तिथे राहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्यास शोधू शकला नाही, मग हेरोदाने पहारेकऱ्यांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली, नंतर हेरोद यहूदीया प्रांतातून निघून गेला, तो कैसरीया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला.