Acts 12:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हेरोद सोर व सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता. ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले. ब्लस्तसला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले. ब्लस्तस हा राजाचा खाजगी सेवक होता. लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सोर व सिदोन येथील लोकांवर हेरोद रागावला होता म्हणून ते एक गट करून त्याच्याकडे आले व राजाच्या महालावरील अधिकारी ब्लस्त ह्याला अनुकूल करून घेऊन त्यांनी समेट करण्याची विनंती केली कारण त्यांच्या देशाला हेरोद राजाचा देश अन्नसामग्री पुरवीत असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेरोद सोरकरांवर व सीदोनकरांवर रागावला होता; म्हणून ते एकमताने त्याच्याकडे आले; व राजाच्या रंगमहालावरील अधिकारी ब्लस्त ह्याला अनुकूल करून घेऊन, त्यांनी समेट करण्याची विनंती केली, कारण त्या राजाच्या देशावर त्यांच्या देशाचे पोषण होत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो सोर व सीदोन येथील लोकांबरोबर भांडण करीत होता; ते आता एकत्र झाले आणि त्यांनी त्याच्याबरोबर विशेष भेट ठरविली. राजाचा विश्वासू वैयक्तिक सेवक ब्लस्तचा पाठिंबा मिळविल्यानंतर त्यांनी शांततेची मागणी केली, कारण ही शहरे त्यांच्या अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी हेरोद राजाच्या देशावर अवलंबून होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेरोद सोर व सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता, ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले, ब्लस्तला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले, ब्लस्त हा राजाचा खाजगी सेवक होता, लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता.