Acts 13:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला. पिर्गापासून पुढे ते अंत्युखियास गेले. (जे पिसीडीयाजवळ होते.) अंत्युखियात असताना शब्बाथ दिवशी ते यहूदी सभास्थानात गेले आणि तेथे बसले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते पिर्गा येथून निघून पिसिदियांतील अंत्युखियास पोहचले. साबाथ दिवशी ते सभास्थानात जाऊन बसले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर ते पिर्गा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंत्युखियास पोहचले; आणि शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन बसले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते पेर्गापासून पुढे पिसिदिया प्रांतातील अंत्युखियास गेले. शब्बाथ दिवशी ते सभागृहात गेले आणि तिथे खाली जाऊन बसले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पौल व त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला, पिर्गापासून पुढे ते पिसिदीयांतील अंत्युखियास गेले आणि शब्बाथ दिवशी ते सभास्थानात गेले आणि तेथे बसले.