Acts 13:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पवित्र शास्त्रातील नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लोखाणाचे वाचन झाले, मग सभास्थानच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविला: “बधूनो, येथील लोकांना काही मदत होईल असे काही तरी तुम्हांला सांगायचे असेल तर कृपा करुन बोला!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नियमशास्त्राचे व संदेष्ट्याच्या ग्रंथाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना संदेश पाठवला, “बंधुजनहो, तमुच्याजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा नियमशास्त्राचे व संदेष्ट्यांच्या ग्रंथांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकार्यांनी त्यांना सांगून पाठवले की, “बंधुजनहो, तुमच्याजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नेहमीप्रमाणे नियमशास्त्र व संदेष्ट्यांच्या ग्रंथातून वाचल्यानंतर, सभागृहातील पुढार्यांनी त्यांना म्हटले: “बंधूंनो, आपल्याजवळ लोकांसाठी काही उत्तेजनपर वचन असेल तर कृपा करून आम्हास सांगा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविला, “बंधुनो, येथील लोकांस काही मदत होईल असे काही बोधवचने सांगा.”