Acts 13:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलाच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली. ते ज्या काळात इजिप्तमध्ये परकी म्हणून राहत होते, त्याकाळात देवाने त्यांना यशस्वी होण्यास मदत केली. मोठ्या सामर्थ्याने देवाने त्यांना त्या देशातून बाहेर आणले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
इस्राएली लोकांच्या ह्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले. ते लोक मिसर देशात उपरी असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी हाताने त्यांना तेथून काढले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले, ते लोक मिसर देशात उपरे असताना त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तेथून काढले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या इस्राएली राष्ट्राच्या परमेश्वराने आपल्या पूर्वजांना निवडून घेतले आणि इजिप्तमध्ये राहत असताना त्यांना फलद्रूप केले. परमेश्वराने आपल्या महान बलाने त्यांना त्या देशातून व गुलामगिरीतून बाहेर आणले;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या इस्राएल लोकांच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली आणि ते ज्या काळात मिसरमध्ये परकी म्हणून राहत होते, त्या काळात देवाने त्यांना अगणित केले आणि उभारलेल्या बाहूने त्यांना तेथून बाहेर आणले.