Acts 14:23 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली. त्यांनी या वडिलांसाठी उपास आणि प्रार्थना केल्या, प्रभु येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभुच्या हाती सोपविले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक ख्रिस्तमंडळीत वडीलजन निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्याच्याकडे त्यांना सोपवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले; आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पौल आणि बर्णबाने प्रत्येक मंडळीमध्ये वडिलांची नेमणूक केली आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्या प्रभूला त्यांचे समर्पण केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली, त्यांनी या वडिलांसाठी उपवास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले.