Acts 15:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आम्ही असे ऐकले की, आमच्यातील काही लोक तुमच्याकडे आले. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यामुळे तुम्हांला त्रास झाला व तुम्ही हताश झालात. परंतु आम्ही त्यांना हे करण्यास सांगितले नाही!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आमच्यापैकी काहींनी जाऊन त्यांच्या बोलण्याने तुमच्या मनात संदेह निर्माण करून तुम्हांला त्रास दिला, असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आमच्यापैकी काहींनी जाऊन आपल्या बोलण्याने (म्हणजे सुंता करून घ्यावी व नियमशास्त्र पाळावे असे सांगून) तुम्हांला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करायला सांगितले नव्हते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमच्यामधून काहीजण आमच्या परवानगीशिवाय तिथे येऊन तुम्हाला गोंधळात पाडत आहेत आणि त्यांच्या बोलण्याने तुमची मने विचलित करीत आहेत असे आमच्या ऐकण्यात आले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आमच्यापैकी काहींना जाऊन आपल्या बोलण्याने तुमचे जीव घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते.