Acts 16:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर आम्ही फिलिप्पैला गेलो. ते त्या भागातील मासेदोनियातील पहिले नगर आहे. ते रोमी लोकांचे नगर आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथून फिलिप्पै या ठिकाणी गेलो. ते मासेदोनिया ह्या प्रमुख जिल्ह्यातील शहर होते व तेथे रोमन लोकांची वसाहत होती. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथून फिलिप्पैस गेलो; ते मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथून आम्ही प्रवास करून फिलिप्पै, जे रोमी वसाहतीत असून मासेदोनियाच्या शहरामधील एक महत्त्वाचे नगर होते तिथे गेलो. तिथे आम्ही बरेच दिवस राहिलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथून फीलिप्पै शहरास गेलो; ते मासेदोनियाचे या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमन लोंकाची वसाहत आहे त्या नगरात आम्ही काही दिवस राहीलो.