Acts 16:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्या लोकांची ही मुलगी नोकरी करीत असे त्यांनी हे पाहिले. त्यांनी हे ओळखले की, आता ते त्या मुलीचा वापर पैसे कमविण्यासाठी करु शकणार नाहीत. म्हणून त्यांनी पौल व सीला यांना धरुन शहरातील सभेच्या ठिकाणी ओढून नेले. शहराचे अधिकारीही तेथे होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपल्या मिळकतीची संधी गेली, असे पाहून तिच्या धन्याने पौल व सीला ह्यांना धरून चौकात अधिकाऱ्यांसमोर ओढून नेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सीला ह्यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्याला जे धन मिळत होते ते आता मिळणार नाही असे पाहून तिच्या धन्यांनी, पौल व सीलाला पकडून अधिकार्‍यांना तोंड देण्याकरिता बाजारपेठेत ओढत नेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सीला ह्यांना धरून पेठेत अधिकाऱ्यांकडे ओढून नेले.