Acts 16:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अचानक मोठा धरणीकंप झाला. तो इतका जबरदस्त होता की त्यामुळे तुरुगाचे पाये डळमळले. मग तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले. सर्व कैद्यांची त्यांच्या साखळदंडातून सुटका झाली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा एकाएकी भयंकर भूकंप झाला आणि तुरुंगाचा पाया डगमगला. सर्व दरवाजे तत्काळ उघडले व सर्वांच्या बेड्या तुटल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले; सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अचानक तीव्र भूकंपाने तुरुंगाचा पाया डळमळला. एकाएकी तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि सर्व कैद्यांचे साखळदंड मोकळे झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.