Acts 16:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तीमथ्याला आपल्याबरोबर प्रवासाला घेऊन जावे अशी पौताची इच्छा होती. पण त्या भागात राहणाऱ्या यहूदी लोकांना माहीत होते की, तीमथ्याचे वडील ग्रीक (यहूदीतर) आहेत. म्हणून पौलाने यहूदी लोकांचे समाधान होण्यांसाठी तीमथ्याची सुंता केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलची इच्छा होती, त्या ठिकाणी जे यहुदी होते, त्यांच्याखातर त्याने त्याला घेऊन त्याची सुंता केली, कारण त्याचा बाप ग्रीक आहे, हे सर्वांना ठाऊक होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती; तेव्हा त्या ठिकाणी जे यहूदी होते त्यांच्याखातर त्याने त्याला घेऊन त्याची सुंता केली; कारण त्याचा बाप हेल्लेणी आहे हे सर्वांना ठाऊक होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याला आपल्याबरोबर फेरीत सामील करावयाचे असल्यामुळे पौलाने निघण्यापूर्वी तीमथ्याची सुंता करविली, कारण त्या भागातील सर्व यहूदीयांना त्याचे वडील ग्रीक असल्याचे माहीत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती; तेव्हा त्याठिकाणी जे यहूदी होते त्यांच्याखातर त्याने त्यास घेऊन त्यांची सुंता केली; कारण त्याचा पिता ग्रीक आहे हे सर्वांना ठाऊक होते.