Acts 16:37 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु पौल त्या शिपायांना म्हणाला, “तुमच्या पुढाऱ्यांनी आम्ही चूक केली आहे हे सिद्ध केले नाही. परंतु त्यांनी आम्हांला लोकांसमोर मारले व तुरुंगात टाकले. आम्ही रोमी नागरिक आहोत म्हणून आम्हांला अधिकार आहेत. आता पुढाऱ्यांना वाटते की आम्ही गुप्त्पणे निघून जावे. नाही! पुढाऱ्यांनी येऊन आम्हांना बाहेर काढले पाहिजे!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु पौल शिपायांना म्हणाला, “आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हांला उघडपणे फटके मारून तुरुंगात टाकले आणि आता ते आम्हांला गुप्तपणे पाठवतात काय? हे चालणार नाही, त्यांनी स्वतः येऊन आम्हांला बाहेर काढावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु पौल त्यांना म्हणाला, “आम्ही रोमी माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हांला उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हांला गुप्तपणे घालवतात काय? हे चालणार नाही; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हांला बाहेर काढावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु पौल अधिकार्यांना म्हणाला: “त्यांनी आमची चौकशी न करता आम्हाला जाहीरपणे फटके मारले आणि आम्ही रोमी नागरिक असतानाही आम्हास तुरुंगात डांबले. आता आम्ही गुपचूप निघून जावे, अशी त्यांची इच्छा आहे काय? त्यांनी स्वतः येऊन आम्हास मुक्त करावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु पौल त्यांना म्हणाला, “आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हास उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालवितात काय? हे चालणार नाही; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर काढावे.”