Acts 16:38 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शिपायांनी पुढाऱ्यांना पौल जे म्हणाला, ते सांगितले, जेव्हा पुढाऱ्यांनी ऐकले की पौल व सीला रोमी नागारिक आहेत, तेव्हा ते घाबरले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिपायांनी हे अधिकाऱ्यांना सांगितले. ते रोमन नागरिक आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकार्यांना सांगितले. तेव्हा ते रोमी आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अधिकार्यांनी जाऊन हे शब्द न्यायाधीशांना कळविले, पौल व सीला हे रोमी नागरिक आहेत, हे त्यांना समजले तेव्हा ते घाबरले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यास सांगितले, तेव्हा ते रोमन आहेत हे ऐकून त्यास भय वाटले.