Acts 17:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे यहूदी लोक थेस्सलनीका येथील यहूदी लोकांपेक्षा बरे होते. पौल व सीला यांनी गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी त्यांनी आनंदाने ऐकल्या. बिरुया येथील हे यहूदी लोक पवित्र शास्त्राचा दररोज अभ्यास करीत. या गोष्टी खऱ्याच घडल्या आहेत की काय याविषयी जाणून घेण्यास ते उत्सुक होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथील लोक थेस्सलनीकामधल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते, त्यांनी मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या संदेशाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते दररोज धर्मशास्त्राचा अभ्यास करू लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता बिरुया येथील यहूदी थेस्सलनीकातील लोकांपेक्षा थोर चरित्राचे होते, त्यांनी संदेश मोठ्या उत्सुकतेने ऐकला पौलाची विधाने खरी आहेत की नाहीत, हे ते प्रतिदिवशी वचनांची तपासणी करून पाहात असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोंकापेक्षा मोठया मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रलेखात दररोज शोध करीत गेले.