Acts 17:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु जेव्हा थेस्सलनीका येथील यहूदी लोकांना समजले की पौल बिरुया येथेही देवाचे वचन सांगत आहे, ते बिरुया येथे सुद्धा आले. थेस्सलनीका येथील यहूदी लोकांनी बिरुया येथील लोकांना हैराण केले व त्रास दिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे, हे थेस्सलनीकातल्या यहुदी लोकांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांचे कान फुंकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरीपण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकातल्या यहूद्यांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळवून चेतवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
थेस्सलनीकातील यहूद्यांनी पौल बिरुया येथे परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करीत आहे असे ऐकले, तेव्हा काहीजण तिथे गेले आणि त्यांनी तिथेही समुदायामध्ये चळवळ व खळबळ उडवून दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरीही पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकांतल्या यहूद्यांना समजले तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांस खवळून चेतविले.