Acts 17:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
विश्वासणारे जे पौलाबरोबर गेले होते त्यांनी त्याला अथेनै शहरात आणले. या बांधवांनी पौलचा संदेश जो सीला व तीमथ्यासाठी होता, तो घेऊन ते परत आले. संदेशात असे म्हटले होते. ʇतुम्हांला शक्य होईल तितक्या लवकर माइयाकडे या.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पौलाला पोहचविणाऱ्यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले. सीला व तीमथ्य ह्यांनी आपणाकडे होईल तितक्या लवकर यावे, असा पौलाचा आदेश घेऊन ते परत आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पौलाला पोहचवणार्‍यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले, आणि सीला व तीमथ्य ह्यांनी आपल्याकडे होईल तितक्या लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेऊन ते निघाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पौलाबरोबर जे गेले होते त्यांनी त्याला ॲथेन्सला पोहोचविले आणि सीला व तीमथ्य यांनी त्वरा करून त्याला येऊन मिळावे अशी आज्ञा त्यांना केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा पौलाला पोहचविणाऱ्यांनी त्यास अथेनैपर्यंत नेले आणि सीला व तीमथ्य ह्यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेउन ते निघाले.