Acts 17:22 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग पौल अरीयपगाच्या सभेपुढे उभा राहिला, पौल म्हणाला, ‘अर्थनैच्या लोकांनो, मी पाहत आहे की, सर्व गोष्टींमध्ये तुम्ही फार धर्मिक आहात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पौल सभेपुढे उभा राहून म्हणाला, “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व फार धार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्मिक आहात, असे मला दिसते;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पौल अरीयपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला: “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व बाबतींत धर्मभोळे (देवदेवतांना फार मान देणारे) आहात असे मला दिसते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पौल अरीयपगाच्या बैठकीमध्ये मध्यभागी उभा राहून म्हणाला: “ॲथेन्सच्या नागरिकांनो! आपण सर्व दृष्टीने अतिशय धार्मिक वृत्तीचे आहात, ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा पौल अरियपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्वबाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते.