Acts 17:23 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी तुमच्या शहरातून जात होतो आणि ज्यांची तुम्ही उपासना करता ते मी पाहिले. मी एक वेदी पाहिली. त्यावर असे लिहिले होते: ‘अज्ञात देवाला’. तुम्ही अशा देवाची उपासना करता जो तुम्हांला माहीत नाही. याच देवाविषयी मी तुम्हांला सांगत आहे!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, ‘अज्ञात देवाला’ ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता, ते मी तुम्हांला प्रकट करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, ‘अज्ञात देवाला’ ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हांला जाहीर करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण मी बाहेर फिरत असताना, तुमच्या पूजेच्या वस्तूंकडे मी काळजीपूर्वक पाहिले, मला एक वेदीसुद्धा दिसून आली जिच्यावर असा शिलालेख होता: अज्ञात परमेश्वराला. म्हणजे ज्या परमेश्वराला तुम्ही ओळखत नाही त्याची तुम्ही उपासना करता आणि आता त्यांच्याविषयीच मी तुम्हाला सांगत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मी फिरता फिरता तुमच्या उपासनेच्या वस्तू पाहतांना, अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हास जाहीर करतो.