Acts 17:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा लोकांनी ऐकले की, येशूला मरणातून पुन्हा उठविण्यात आले तेव्हा त्यांच्यातील काही जण हसू लागले. लोक म्हणाले, “आम्ही याविषयी नंतर पुन्हा ऐकू!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या वेळी मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. परंतु इतर काही जण म्हणाले, “ह्याविषयी पुन्हा कधीतरी तुमचे विचार ऐकायला आम्हांला आवडेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल पौल बोलला, तेव्हा ऐकणार्यांपैकी काहींनी टोमणे मारले, परंतु इतर म्हणाले, “आम्हाला याविषयी पुढे कधी तरी ऐकावयास आवडेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले, कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.”