Acts 17:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण त्यांना पौल व सीला सापडले नाहीत. म्हणून लोकांनी यासोनाला व आणखी काही दुसऱ्या विश्वासणाऱ्यांना नगराच्या अधिकाऱ्यांपुढे ओढीत नेले. ते मोठ्याने ओरडून म्हणाल, “या लोकांनी जगात सगळीकडे उलथापालथ केली. आणि आता ते येथेसुद्धा आले आहेत!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु ते त्यांना मिळाले नाहीत, तेव्हा त्यांनी यासोनला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढत नेऊन आरडाओरड करत म्हटले, “ज्यांनी जगाची उलथापालथ केली, ते येथेही आले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकार्यांकडे ओढत नेऊन आरडाओरड करत म्हटले, “ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण ते तिथे नाहीत, असे पाहून त्यांनी यासोन व इतर काही विश्वासणार्यांना ओढून काढले व त्यांना शहर न्यायाधीशांपुढे नेऊन आरडाओरड करून म्हणाले, “या माणसांनी सर्व जगात उलथापालथ केली आहे आणि आता ते येथेही आलेले आहेत;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आरडाओरड करीत म्हटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत.