Acts 18:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहूदी लोकाना म्हणाला, “एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गल्लियोने यहुदी लोकांना म्हटले, “अहो यहुदी लोकांनो, हे प्रकरण दुष्ट गुन्हेगारीचे अथवा दुष्कृत्याचे असते, तर मला तुम्हांला समजून घेणे सयुक्तिक ठरले असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गल्लियोने यहूद्यांना म्हटले, “अहो यहूद्यांनो, हे प्रकरण गैरशिस्त वर्तनाचे अथवा दुष्कृत्याचे असते तर मला तुमचे म्हणणे मनावर घेण्यास कारण झाले असते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पौल आता बोलणार होता इतक्यातच, गल्लियो त्यांना म्हणाला, “जर तुम्ही यहूदी गंभीर गुन्हा किंवा दुराचाराची तक्रार करीत असाल, तर तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी काहीतरी कारण असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहूदी लोकांस म्हणाला, “एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते.