Acts 18:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाच्या देवाच्या भक्ताच्या घरी गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग तेथून निघून तो तीत युस्त नावाच्या देवभक्ताच्या घरी गेला. त्याचे घर सभास्थानाच्या जवळ होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर पौल सभागृह सोडून तीतुस यूस्त नावाच्या माणसाच्या घरी गेला. तो परमेश्वराचा उपासक होता आणि सभागृहा शेजारीच राहत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाचा देवाचा उपासक याच्या घरी गेला.