Acts 19:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण पहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे! तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांना प्रभावित केले आहे व बदलले आहे. त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, माणसांच्या हातून बनविलेले देव खरे देव नाहीत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही पाहता व ऐकता की, हाताने केलेले देव हे देवच नाहीत, असे त्या पौलाने केवळ इफिस येथेच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात सांगून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितविले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही पाहता व ऐकता की, हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही पाहता व ऐकता की इफिसातच केवळ नव्हे तर बहुतेक सर्व आशिया देशातील बहुसंख्य लोकांची या पौलाने खात्री पटवली आहे व त्यांना चुकीची कल्पना करून दिली आहे. तो म्हणतो की मानवी हातांनी तयार केलेली दैवते मुळीच परमेश्वर नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण पाहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांस प्रभावित केले आहे व बदलले आहे, त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, मनुष्यांच्या हातून बनवलेले देव खरे देव नाहीत.