Acts 19:29 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला. आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदिनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यामुळे शहरात गोंधळ उडाला आणि पौलाचे सहप्रवासी, मासेदोनियाचे गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढीत ओढीत ते एकजुटीने रंगभवनात धावत गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इतक्यात नगरात गोंधळ उडाला; आणि पौलाचे वाटेतले सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढत ओढत ते एकजुटीने नाटकगृहात धावत गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लवकरच संपूर्ण शहरात एकच गोंधळ माजला. पौलाचे प्रवासातील सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख, यांना लोकांनी अटक केली आणि त्यांना नाटकगृहाकडे ओढून नेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदोनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले.