Acts 19:32 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करु लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करु लागले. त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला. आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या नाय्यभवनात एकत्र का आलोत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची आरडाओरड होऊ लागली, लोकांचा एकच गोंधळ उडाला कारण आपण कशासाठी जमलो आहोत, हेदेखील बहुतेकांना कळले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा कोणी काही, कोणी काही अशा आरोळ्या मारू लागले; लोकांचा एकच गोंधळ उडाला; आणि आपण कशाला जमलो आहोत हे बहुतेकांना कळले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सभेत गोंधळ माजलेला होता: कोणी काही, तर इतर दुसरेच काहीतरी म्हणत होते. खरे म्हणजे, बहुतेकांना आपण येथे कशासाठी आलो आहोत हे देखील माहीत नव्हते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करू लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करू लागले, त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या न्याय भवनात एकत्र का आलोत.