Acts 19:35 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शहराचा लेखनिक लोकांना शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे. हे ज्याला माहीत नाही असा एक तरी माणूस जगात आहे काय?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शेवटी नगराचा प्रशासक लोकांना शांत करून म्हणाला, “अहो इफिसकरांनो, महान अर्तमीचे देऊळ व स्वर्गातून पडलेली मूर्ती ह्यांचे इफिस नगर हे संरक्षक आहे, हे कोणाला ठाऊक नाही?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग नगराचा शिरस्तेदार लोकांना शांत करून म्हणाला, “अहो इफिसकरांनो, महान अर्तमीचे देऊळ व आकाशातून पडलेल्या मूर्ती ह्यांचे इफिस नगर हे संरक्षक आहे, हे ज्याला ठाऊक नाही असा कोण माणूस आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सरतेशेवटी नगर लेखनिकाने जमावाला शांत करून म्हटले: “इफिसच्या नागरिकांनो, स्वर्गातून खाली पडलेल्या त्या थोर अर्तमीसच्या मूर्तीचे व मंदिराचे संरक्षक इफिस शहर आहे, हे सर्व जगाला माहीत नाही का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शहराचा लेखनिक लोकांस शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे, हे ज्याला माहीत नाही असा एकतरी मनुष्य जगात आहे काय?