Acts 2:39 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे अभिवचन तुम्हांसाठी आहे, हे तुमच्या मुलांना आणि जे लोक खूप दूर आहेत त्यांनासुद्धा आहे. प्रभु आपला देव, ज्यांना स्वत:कडे बोलावितो अशा प्रत्येक व्यक्तीला ते दिलेले आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण देवाचे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना आपला प्रभू परमेश्वर स्वतःकडे बोलावितो तितक्यांना दिले आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे वचन तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी आणि सर्वांसाठी जे फार दूर आहेत आणि ज्यांना प्रभू आमचे परमेश्वर बोलावतील त्यांच्यासाठी आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण हे वचन तुम्हास तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत, त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे.”