Acts 2:46 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्व विश्वासणारे मंदिरामध्ये दररोज एकत्र जमत. त्या सर्वांचा उद्देश सारखाच होता. ते त्यांच्या घरामध्ये एकत्र खात. आपले अन्न इतरंना वाटण्यात त्यांना फार आनंद होत असे आणि आनंदी मनाने ते खात असत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दररोज मंदिराच्या अंगणात ते एकत्र जमत होते आणि त्यांच्या घरांमध्ये भाकर मोडीत असत आणि मोठ्या आनंदाने व कृतज्ञ मनाने एकत्र खात होते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत;