Acts 20:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता. तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आम्ही शनिवारी सायंकाळी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो, तेव्हा पौलाने त्यांच्यापुढे भाषण केले. त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबविले, कारण तो दुसऱ्या दिवशी जाणार होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले; तो दुसर्‍या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्याकरिता एकत्रित आलो. पौल लोकांबरोबर बोलला आणि दुसर्‍या दिवशी तो जाणार होता, म्हणून मध्यरात्र होईपर्यंत बोलतच राहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता, तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला.