Acts 21:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या चौघांना घे व स्वत:चे त्यांच्यासह शुद्धीकरण करुन घे. त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडण करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर. मग सर्वांना हे समजेल की, त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा आणि त्यांनी मुंडण करावे म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा म्हणजे तुमच्याविषयी जे कळविण्यात आले आहे, त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून योग्य प्रकारे वागता हे सर्वांस कळेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा, आणि त्यांनी मुंडण करावे म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा म्हणजे तुमच्याविषयी जे कळवण्यात आले आहे त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थित वागता हे सर्वांना कळून येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर तू या माणसांना घेऊन शुद्धीकरणाचा विधी पूर्ण कर आणि त्यांच्या मुंडणाचा खर्च कर, म्हणजे ते त्यांच्या डोक्यांचे मुंडण करू शकतील व प्रत्येकाला समजेल की तू स्वतःसुद्धा नियमशास्त्र पाळतोस आणि तुझ्याबद्दलच्या अहवालात जे सांगितलेले आहे, त्यात काही तथ्य नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या चौघांना घे व स्वतःचे त्यांच्यासह शुद्धीकरण करून घे, त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडण करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर, मग सर्वांना हे समजेल की, त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल.