Acts 21:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग पौलानेच त्या चार लोकांना आपल्याबरोबर घेतले. दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला. मग तो मंदिरात गेला. शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले. शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन गेला व दुसऱ्या दिवशी त्याने त्यांच्याबरोबर शुद्धीकरणाचा विधी पार पाडला. नंतर मंदिरात जाऊन त्याने व्रताचे दिवस कधी संपतील याविषयी सूचना दिली कारण त्यानंतर तो त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी अर्पण वाहणार होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन दुसर्‍या दिवशी त्यांच्याबरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला, आणि ज्या दिवशी त्यांच्यातील एकेकासाठी अर्पण करायचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करत आहोत असे त्याने दाखवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुसर्‍या दिवशी पौलाने त्या माणसांना घेऊन त्यांच्याबरोबर स्वतःस शुद्ध करून घेतले. जेव्हा त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीचे दिवस समाप्त होतील आणि त्यांच्यातील प्रत्येकासाठी अर्पण करावे लागेल, त्या तारखेची सूचना देण्यासाठी तो मंदिरात गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग पौलानेच त्या चार लोकांस आपल्याबरोबर घेतले, दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला, मग तो परमेश्वराच्या भवनात गेला, शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले, शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल.