Acts 21:27 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सात दिवस जवळ जवळ संपत आले होते. परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला मंदिरात पाहिले. त्यानी लोकांना भडकाविले व त्याला (पौलाला) धरले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते सात दिवस पूर्ण होत आले तेव्हा आशिया प्रांतातल्या यहुदी लोकांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चिथवले आणि त्याच्यावर हात टाकून
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते सात दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास आशिया प्रांतातल्या यहूद्यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चिथवले, आणि त्याच्यावर हात टाकून
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते सात दिवस अंदाजे संपत आलेले असताना, आशियातून आलेल्या काही यहूद्यांनी पौलाला मंदिरात पाहिले. तेव्हा त्यांनी सर्व जमावाला चिथविले व त्याला पकडले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सात दिवस जवळ जवळ संपत आले होते, परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला परमेश्वराच्या भवनात पाहिले, त्यांनी लोकांस भडकाविले व पौलाला धरले.