Acts 21:32 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले. व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला. जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिपाई व रोमन अधिकारी ह्यांना घेऊन तो त्यांच्याकडे तत्काळ धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारावयाचे थांबविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तत्काळ तो शिपाई व शताधिपती ह्यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारायचे थांबवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा तो त्वरित आपल्या सैनिकांना व अधिकार्‍यांना घेऊन धावत समुदायाकडे गेला. मारणार्‍यांनी सेनापतीला व फौजेला येताना पाहिल्याबरोबर पौलाला फटके मारण्याचे थांबविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला, जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले.