Acts 21:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सोर पासून आम्ही आमचा प्रवास सुरु केला व पोलेमा येथे उतरलो. आणि तेथील बंधुवर्गास भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आम्ही आमचा सोरपासूनचा जलप्रवास संपविला आणि प्तलमैस येथे येऊन व बंधुजनांस भेटून त्यांच्याजवळ एक दिवस राहिलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आम्ही आपला सोरापासूनचा जलप्रवास संपवला आणि प्तलमैसास येऊन व बंधुजनांना भेटून त्यांच्या येथे एक दिवस राहिलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सोरापासूनचा जलप्रवास आम्ही चालू ठेवला व त्यानंतर आम्ही प्टोलेमाईस येथे उतरलो. तेथील बंधू, भगिनींची आम्ही भेट घेतली आणि एक दिवस त्यांच्याबरोबर राहिलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सोरापासून आम्ही आमचा प्रवास सुरू केला व पोलेमा येथे उतरलो आणि तेथील बंधुजनांना भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो.