Acts 22:25 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु जेव्हा पौलाला चाबकाने मारण्यासाठी बाहेर काढले, तेव्हा पौल जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्याच्यामध्ये काही अपराध आढळत नाही अशा रोमी नागरिकाला तुमचे हे चाबकाचे मारणे कायदेशीर ठरते काय?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु त्यांनी त्याला बांधावयास सुरुवात केली तेव्हा जवळ उभ्या असलेल्या रोमन अधिकाऱ्याला पौलाने विचारले, “ज्या रोमन नागरिकाला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्यांनी त्याला वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला पौलाने म्हटले, “रोमी मनुष्याला व तशात ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते पौलाला फटके मारण्यासाठी बांधत होते त्यावेळेस पौल तिथे उभा असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्या मनुष्यावर दोषारोप अजून सिद्ध झालेला नाही, अशा रोमी नागरिकाला फटके मारणे हे कायद्याने योग्य आहे का?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्यांनी त्यास वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधीपतीला पौलाने म्हटले, “रोमन मनुष्यास व ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”