Acts 22:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी एक यहूदी आहे. आणि किलिकीया प्रांतातील तार्स येथे माझा जन्म झाला. परंतु याच शहरात मी लहानाचा मोठा झालो, आपल्या पूर्वजांच्या नियमांचे सविस्तर शिक्षण मी गमालीएल यांच्या पायाजवळ बसून घेतले. जसे तुम्ही आज देवाविषयीच्या आवेशाने भरलेल आहात तसाच मी देखील देवाविषयीच्या आवेशाने भरलेला होतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“मी यहुदी आहे. माझा जन्म किलिकिया येथील तार्स नगरात झाला आणि मी ह्या यरुशलेम शहरात गमलिएलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे काटेकोर शिक्षण मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मी यहूदी आहे. माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले, आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी एक यहूदी आहे आणि माझा जन्म किलिकियामधील तार्सस शहरात झाला, परंतु मी या शहरात वाढलो. माझे शिक्षण गमालियेलच्या मार्गदर्शनात झाले व आपल्या पूर्वजांच्या नियमशास्त्राचे सविस्तर प्रशिक्षण मला मिळाले. जसे तुम्ही आज परमेश्वराविषयी आवेशी आहात तसाच मीही होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी यहूदी आहे, माझा जन्म किलकीयातील तार्स नगरांत झाला आणि मी या शहरांत गमलियेलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडीलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.