Acts 22:30 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवशी यहूदी लोक पौलावर नेमके कशामुळे दोष ठेवीत होते हे समजून घेण्यासाठी सरदाराने त्याला मोकळे सोडले. मग त्याने मुख्य याजक व धर्मसभेचे सभासद यांना एकत्र जमण्याची आज्ञा केली, मग त्याने पौलाला आणून त्यांच्यापुढे उभे केले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
यहुदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप ठेवला होता, तो काय आहे, हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने पौलाला बेड्यांतून मोकळे केले आणि मुख्य याजक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला तेथे आणून त्यांच्यापुढे उभे केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्‍चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. म्हणून दुसर्‍या दिवशी त्याने त्याला मोकळे केले, आणि मुख्य याजक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला खाली आणून त्यांच्यापुढे उभे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सेनापतीला हे शोधून काढायचे होते की, खरोखर कोणत्या कारणाने यहूदी लोक पौलाला आरोपी ठरवीत आहेत. म्हणून त्याने दुसर्‍या दिवशी पौलाला मुक्त केले आणि मुख्य याजक व सर्व न्यायसभेचे सभासद यांना एकत्र होण्याचा हुकूम केला. त्यांनी पौलाला न्यायसभेपुढे आणून उभे केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते, म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्यास मोकळे केले आणि मुख्य याजक लोक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकुम करून पौलाला खाली आणून त्याच्यापुढे उभे केले.