Acts 22:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याची मुख्य याजक व धर्मसभेचे सर्व वडीलजन साक्ष देतील. त्यांच्याकडून दिमिष्कातील त्यांच्या बंधुजनांच्या नावाने मी पत्रे घेतली. आणि तेथे ह्या मार्गांचे (ख्रिस्ती) जे लोक होते, त्यांना कैदी म्हणून यरुशलेमास घेऊन येणार होतो, यसाठी की त्यांना शिक्षा व्हावी.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याविषयी उच्च याजक व सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे. मी त्यांच्याकडून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्क ह्या ठिकाणी चाललो होतो, ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेममध्ये शासन करावयास आणावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याविषयी प्रमुख याजक व सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेमेत शासन करण्यास आणावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
महायाजक व येथे असलेले सर्व सभासद, ते स्वतः याबाबतीत साक्ष देऊ शकतात की, मी त्यांच्याकडून दिमिष्क येथील सभेच्या सदस्यांना दाखविण्यासाठी तशी पत्रेसुद्धा मिळविली होती आणि या लोकांना बंदिवान करून यरुशलेम येथे आणून त्यांना शिक्षा केली जावी यासाठी तिथे गेलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याविषयी महायाजक व सगळा वडिलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरूशलेम शहरात शासन करावयास आणावे.