Acts 23:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वादविवादाला हिंसक रुप येऊ लागले. तेव्हा लोक पौलाचे कदाचित तुकडे तुकडे करतील, अशी सरदाराला भीति वाटू लागली, म्हणून त्याने शिपायांना पौलाला तेथून घेऊन जाण्याची आज्ञा केली. व त्याला किल्ल्यात घेऊन जाण्यास सांगितले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असे त्यांच्यांत कडाक्याचे भांडण चालले असता ते पौलाच्या चिंधड्या उडवतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वादाने उग्र स्वरूप धारण केले, सरतेशेवटी सेनापतीला भीती वाटली की ते पौलाचे फाडून तुकडे करतील. तेव्हा त्याने त्याच्या सैनिकांना हुकूम दिला की, त्यांनी खाली जाऊन त्याला त्यांच्यापासून जबरदस्तीने दूर करावे आणि पुन्हा बराकीत घेऊन यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता; ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकुम केला की, खाली जाऊन त्यास त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.